दोन पबला पालिकेने ठोकले टाळे

नवी मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पालिका प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला असून कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अनिर्वाय आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर पालिका व पोलिसांनी कारवाई करीत सीबीडी येथील धमाका आणि एपीएमसीतील नशा या दोन पबला टाळे ठोकले आहेत.

नवी मुंबई पोलिसांकडून शहरात नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम हाती घेतली आहे. यात अमलीपदार्थ विक्रीबरोबर शहरातील पब, बारमध्ये कारवाई करण्यात येत आहे. 6 मार्च रोजी नशा बारमध्ये पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत दोनशेपेक्षा अधिक युवकांना ताब्यात घेण्यात आले होते. यात अनेकजण अल्पवयीन होते. यात कोरोना नियमांचे उल्लंघनही होत होते. सीबीडी येथील धमाका ‘पब’मध्येही असाच प्रकार सुरू होता. मात्र तांत्रिकदृष्टया पोलिसांना कारवाई करता येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी याबाबत लेखी पालिका प्रशासनाला कळविले होते. ही बाब गभीर असल्याने पालिका प्रशासनाने हे दोन्ही पबला टाळे ठाकले आहेत.