कंत्राटी कर्मचाऱ्यांना 7500 रु. वेतनवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 32
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या 19 जून रोजी झालेल्या महासभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या 8,099 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 7,500 रुपयांची विशेष वेतनवाढ मंजूर करण्यात आली. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पगारवाढ मंजूर झाल्यानंतर पालिका मुख्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
महागाई आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती. यापूर्वीही महापालिकेत सुमारे 7 ते 8 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव चर्चेत होता. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या स्तरावर झालेल्या चर्चेनंतर विशेष भत्त्याच्या स्वरूपात ही वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या महासभेमध्ये सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबई महापालिकाक्षेत्रातील सेवा-आधारित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या आर्थिक परिस्थिती, वाढलेला जिवननिर्वाह खर्च, महानगररिय कार्यपरिस्थिती व 2015 पासून वेतन संरचनेमध्ये प्रभावी सुधारणा न झाल्याची बाब विचारात घेऊन नागरी सेवा संचालन विशेष भत्ता लागू करुन विद्यमान विशेष भत्यामध्ये वाढ करण्याचा ठराव पारित केला होता. या ठरावावर सभागृहात सकारात्मक चर्चा घडवून हा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. या ठरावानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 7500 रुपयांची पगारवाढ होणार आहे. पुढच्या महिन्यात या ठरावाची अंमलबजावणी होणार आहे.
या निर्णयामुळे सफाई, आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, वाहतूक आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना मान्यता देण्यात आल्याचे मानले जात आहे. तसेच आरोग्य विमाचेही संरक्षण देण्याची सुचना यावेळी नगरसेवक सुरज पाटील यांनी मांडली. महासभेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर समाज विकास, क्रीडा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण तसेच कुशल, अकुशल आणि अर्धकुशल विभागातील कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत निर्णयाचे स्वागत केले. महापौर सुजाता पाटील, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांसोबत आनंदोत्सवात सहभाग घेतला. यावेळी फटाके, घोषणाबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत कर्मचाऱ्यांनी आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विशेष भत्ता वेतनवाढीचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून यापुढेही ठोक कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा तसेच आशा सेविकांसाठीदिलासा देणारे धोरण आणण्यात येणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai