Breaking News
बायको म्हणजे जीवनाचा आधार असतो. पुरुषीपेक्षा स्त्री जास्त विचार करते? म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न असते . आपल छोटसं घर असावं, सुखी परिवार असावा आणि त्या कुटुंबात आपल्याला पाठिंबा देणारी एक व्यक्ती असावी ती म्हणजे बायको
बायको म्हणजे जीवनाची सोबती, जीवनाचा आधार आणि आयुष्यभरची साथ असते. खरचं ज्या व्यक्तिला बायको चांगली मिळाली तो व्यक्ति आयुष्यात कधीच दु:खी नसतो. बा म्हणजे आपल्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परितिथी साथ देणारी, को म्हणजे कोणासाठी न जागता आपल्यासाठी जगणारी ती म्हणजे बायको असते. आपण दैनंदिन आयुष्यात आपण गाडी चालवतो म्हणजे एका चाकाचा वेग वाढला तर दुसर्याचा चाकाचा वेग लगेच वाढतो, तेव्हा त्या गाडीला स्पीड मिळतो. त्याच पद्धतीने आपल्या दैनंदिन आयुष्यात असते, म्हणजे नवर्याने वेग वाढवला तर बायकोला वेग वाढवायलाच लागतो किंवा बायकोने वेग वाढवला तर नवर्याला वेग वाढवायलाच लागतो तेव्हाच एक सुखी संसार होऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी बायको चिडली त्याठिकाणी नवर्याने शांतता घ्यावी असच दोघांनी एकमेकांना समजून घेण तितकच गरजेचं आहे. यालाच तर सुखी संसार आणि बायकोवाली फीलिंग्स म्हणतात. महाभारतात युदिष्टीराने यक्षाला विचारलेला एक प्रश्न होता की, देवाने पृथ्वीवर पुरुषासाठी निर्माण केलेला एक उत्तम मित्र कोण? त्यावेळेस युदिष्टीराने पटकन उत्तर दिले. ती म्हणजे बायको तसेच पूर्वीच्या काळी जे स्थान आपल्या बायकोला होत तेच स्थान आजच्या काळात सुद्धा आहे. पूर्वीच्या काळी वडील आपल्या मुलासाठी बायको शोधायचे पण आजच्या काळात मुलगा आपल्या वडिलांसाठी सून शोधत आहे. म्हणजे विचार आणि गोष्ट सारखी आहे फक्त जगण्याची पद्धत बदलली आहे.
बायकांची एक गंमत म्हणजे त्यांच्या नवर्याने महिन्यातल्या पगारातील थोडे पैसे दिले तर त्यांना शॉपिंग, एंजॉय करायचा नसतो, तर नवर्याच्या आर्थिक संकटाच्या वेळी किचनमधल्या छोट्याश्या डब्यातून पाचशे आणि हजारची नोट नक्की निघते. का कारण त्यांना माहिती असते की नवर्याच्या आर्थिक संकटाच्या वेळी आपल्यालाच उभे राहायचे आहे. लग्न ही एक अशी गोष्ट आहे की, जिला कधी भेटलो नाही जिच्याशी कधी बोललो नाही तिच्यासोबत आयुष्यभराच्या गाठी जोडायच्या असतात. प्रत्येक तरुण मुलांना वाटत असते की बायको ही आपल्याला आपल्यासारखी मिळायला, पण आपल्या आयुष्यात येण्यासाठी तिने तिचे आई - वडील सोडलेले असतात.
-प्रसाद भालचंद्र सोनवणे (अभिनेता / लेखक )
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai