अभंग शिंदे यांची शिवसेना उपशहरप्रमुखपदी निवड

नवी मुंबई : जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक अभंग शिंदे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची शिवसेना नवी मुंबई उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे खासदार राजन विचारे यांच्या आदेशानुसार व माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले व नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांची नियुक्ती करण्यात आली. 

अभंग शिंदे हे गेली 15 वर्षे जय लहुजी सामाजिक संस्थेमार्फत नवी मुंबईतील गोरगरिबांचे प्रश्‍न सोडवून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. जुलै 2020 मध्ये यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोरोना काळातही त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांच्या खांद्यावर शिवसेना उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. आता संघटनेचे काम वाढवणार असून समाजाचे, गोर गरिबांचे प्रश्‍न त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अभंग शिंदे यांनी दिली. या प्रसंगी उप जिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, नगरसेवक जगदीश गवते,शाखाप्रमुख दिपक आवारे, समाजसेवक राहुल नायडू, विजय बर्‍हाळीकर, अण्णाराव लोकरे, लक्ष्मण सूर्यवंशी, सुनील भुरे आदी मान्यवर उपस्थित होते.