सिडको भवन, रायगड भवनमध्ये प्रवेश बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2021
- 583
नवी मुंबई ः कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाच्या ब्रेक द चेन, या 4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार, सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना 5 एप्रिल 2021 पासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये देखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे.
सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील अधिकारी त्याचप्रमाणे कंत्राटदार यांसारख्या अभ्यागतांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. यातून सदर विषाणूचा संसर्ग व प्रसार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व प्रकारच्या अभ्यागतांना सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य सर्व कार्यालये येथे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सर्व अभ्यागतांना पुढील सूचनेपर्यंत सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य कार्यालये येथे भेट देऊ नये. सदर अभ्यागतांना अतिशय तातडीचे काम असल्यास त्यांनी पत्रव्यवहार, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ईमेल अथवा मेसेजद्वारे संबंधित अधिकारी/कर्मचार्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोने केले आहे. त्याचप्रमाणे अभ्यागतांना ई-व्हिजिटर्स प्रणालीच्या माध्यमातून भेटता येऊ शकणार आहे. सदर प्रणाली सिडकोतर्फे विकसित करण्यात आली असून त्याविषयीची विस्तृत माहिती सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीत ज्या अभ्यागतांना प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल अशांचे आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल निगेटीव्ह आल्यापासून केवळ 48 तासांमध्येच त्यांना विभाग प्रमुखांकडून विशेष व्हिजिटर पास जारी करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या व्हर्च्युअल प्रणालींद्वारेही अभ्यागतांना संबंधित विभागप्रमुखांना भेटता येणार आहे. यात प्रामुख्याने एम एस टीम्स, झूम, वॉट्सप व्हिडीओ, गुगल मीट यांसारख्या प्सचा समावेश आहे. या प्सद्वारे भेट घ्यायची असल्यास सदर प्सचा तपशील सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यागतांनी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधण्यासाठी 022-67918100 या क्रमांकाचा वापर करावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai