तिसर्‍या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज

 तीन हजार ऑक्सिजन बेडची तयारी

रायगड : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अवघे जग हतबल झाले असतानाच आता तिसर्‍या लाटेने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. लहान मुले, गर्भवती महिला, दुर्गम भागातील आदिवासींना तिसर्‍या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेपासून प्रभावी मुकाबला करता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध रुग्णालयांत तबल तीन हजार ऑक्सिजन बेडची तयारी केली आहे. 

जिल्ह्यासाठी पनवेल येथे बालरोग टास्क फोर्स स्थापन्यात आले आहे. कोरोनाची लस देण्याचा कार्यक्रम रडतखडत सुरू आहे. तिसरी लाट येईपर्यंत 18 ते 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसर्‍या लाटेमध्ये प्रामुख्याने गर्भवती महिला, लहान मुले आणि दुर्गम भागात राहणारे आदिवासी नागरिक हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, माणगाव आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. सध्या दोन हजार 449 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 500 ऑक्सिजन, अशा एकूण तीन हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था होणार आहे. तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असल्याने त्यांना तातडीने सर्वतोपरी उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यासाठी पनवेल येथे बालरोग टास्क फोर्स स्थापण्यात आले आहे. ऑक्सिजनची क्षमताही वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या 643 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये आणखीन सात हजार मेट्रिक टनांची वाढ करण्यात येत आहे. तर, जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात येत आहे. आयसीएमआरच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलबद्दल नर्स, पॅरामेडिक्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. एमजीएम, लाइफलाइन, स्वस्थ असे खासगी रग्णालये स्वतंत्र कोविड पेडियाट्रिक सुविधांवर काम करत आहेत. सध्या 643 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. त्यामध्ये आणखीन सात हजार मेट्रिक टनची वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार 650 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन घेणारा रायगड एकमेव जिल्हा असेल. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयामध्येही ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये 19, तर पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये एक असे 20 कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत.औषधांची उपलब्धताकोरोनाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक ती सर्व औषधे जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत, तसेच रेमडेसिविरसारख्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे, तसेच तो निरीक्षण यंत्रणेमार्फत मागणी केलेल्या रुग्णालयांना देण्यात येत आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तिसर्‍या लाटेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, दुर्गम भागात राहणारे आदिवासी नागरिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाचार करण्याबाबत संबंधित यंत्रणेला अवगत करण्यात येत आहे. ऑक्सिजन, ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. लवकरच आपण या महामारीतून बाहेर येऊ.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड