पेट्रोलपाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 02, 2021
- 747
मुंबई : मे महिन्यात 15 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100 रुपयांवर होत असलेली मुंबई ही देशातील पहिली मेट्रो सिटी बनली आहे.
मुंबईत पेट्रोल 100.19 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 93.94 रुपये तर डिझेल 84.89 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 93.97 रुपये आणि डिझेल 87.74 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 89.65 रुपये प्रति लिटर आहे. परभणीत पेट्रोलची किंमत 102. 57 रुपये असून डिझेलची किंमत 93.05 रुपयांवर पोहोचली आहे. पेट्रोलपाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह अन्य काही शहरांमध्ये पेट्रोलने 100 रुपये प्रति लिटरचा आकडा आधीच पार केला आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून 100 रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक झाल्या आहेत. मे महिन्यात आतापर्यंत 13 दिवसांनी दर बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. मे महिन्यात झालेल्या 15 व्या वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 3.28 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेलमध्ये 3.88 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून 69 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. ओएमसीला आणखी काही काळ किंमतींमध्ये सुधारणा करावी लागू शकते. अमेरिकेचे निर्बंध कमी करण्यात उशीर झाल्यानंतर इराण तेलाच्या व्यापारात परत आला आहे. त्यामुळे जागतिक तेलाच्या किंमतीही स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक येतो. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांत प्रमाणित इंधनाची सरासरी किंमत आणि विनिमय दराच्या आधारे दररोज किंमती बदलल्या जातात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai