पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2021
- 733
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणार्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यात पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकणाच्या किनारपट्टी भागात वार्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. अशातच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी ह्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 70-200 मिमीपर्यंतचा पाऊस अपेक्षित असेल. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातार्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी घाट माथ्यांकरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिथे 70 ते 200 मिमीपर्यंतच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात 15-64 मिमीपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस होऊ शकतो. तर 30 आणि 31 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai