खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कोव्हीड विषयक कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पूर्वतयारीला नियोजनबध्द सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने करण्यात येणार्‍या कोव्हीड सुविधा निर्मिती कामांची तसेच त्याठिकाणी पूरक साहित्य उपलब्धतेबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आयुक्तांमार्फत नियमित आढावा घेतला जात असून याविषयी विशेष बैठक घेत आयुक्तांनी सर्वच कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.

कोव्हीडच्या दुसर्‍या लाटेत रूग्ण गंभीर होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवली होती. हा अनुभव लक्षात घेता पालिकेच्या नेरूळ व ऐरोली रूग्णालयांचे कोव्हीड रूग्णालयात रूपांतरण करण्यात येत असून त्याठिकाणी वरील 3 मजल्यांची स्थापत्य आणि विद्युत विषयक कामे 5 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत व नंतर खालील मजल्यांची कामे त्वरित सुरू करावीत असे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले. ही कामे सुरू असतानाच आरोग्य विभागाने सर्जिकल साहित्य, आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून विहित वेळेत सुविधा सुरू करता येतील असे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय ऑक्सिजन बेड्समध्येही 1200 बेड्सची वाढ करण्यात येत असून त्यासाठीची ऑक्सिजन पाईपलाईन व्यवस्थेची कार्यवाही जलद पूर्ण करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे रूग्णवाहिकांच्या संख्येतही 100 इतकी वाढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. 

संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये कोरानो बाधितांमध्ये मुलांची संख्या मोठी असणार अशी शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असून त्यादृष्टीने ऐरोली व नेरूळ येथील दोन्ही नियोजित कोव्हीड रूग्णालयांमध्ये प्रत्येकी 200 पैकी 80 आयसीयू बेड्स हे पेडियाट्रिक म्हणून निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे त्या दोन्ही रूग्णालयात महिलांसाठी प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात कोव्हीड वॉर्ड निर्माण करण्यात येत असून त्याचीही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जलद कोव्हीड निदान होण्यासाठी आवश्यक ट्रू नॅट मशीन्सही घेतल्या जात असून त्याची कार्यवाहीदेखील जलद करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. याशिवाय इतरही नव्याने सुरू करावयाच्या कोव्हीड आरोग्य सुविधा निर्मिती कामाला तसेच नॉऩ कोव्हीड सुविधा कामांना गती देण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. कोव्हीडची साखळी खंडीत करण्याच्या उपाययोजनांचा एक महत्वाचा भाग म्हणून सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट