झिकाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची व्यापक सर्वेक्षण मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2021
- 382
नवी मुंबई ः झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाचे तातडीने विशेष बैठक घेतली. झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणार्या किटकजन्य व साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. याकरिता अधिक काळजीपूर्वक व प्रभावीरित्या उपाययोजना वव्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्याचे निर्देश वैद्यकिय अधिकार्यांना आयुक्तांनी दिले.
पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये झिका विषाणूची लागण झालेला राज्यातील पहिला रूग्ण आढळला असून त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्यासाठी आढावा बैठक घेऊन महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांनी झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणार्या किटकजन्य व साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. झिका, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरासीस आजार होऊच नये याकरिता अधिक काळजीपूर्वक व प्रभावीरित्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकार्यांना दिले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी केले जाणारे ताप सर्वेक्षण तसेच डास उत्पत्ती स्थाने सर्वेक्षण याबाबतची सर्वेक्षण कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले. झिका विषाणू हा एडिस डासांमार्फत पसरतो व त्याची लक्षणे साधारणत: डेंग्यू आजाराप्रमाणे असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, अंगदुखी, सांधेदुखी ही झिका आजाराची सर्वसाधारण लक्षणे असून गरोदर महिलांना हा आजार झाल्यास होणार्या बाळाच्या डोक्याचा घेर कमी असण्यासारखे दोष उद्भवू शकतात. त्यामुळे याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. रूग्ण आढळल्यानंतर कार्यवाही करावीच, मात्र आजार होऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात यावा असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. नागरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणारे सर्वेक्षण हे आजाराची व्याप्ती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असून सर्वेक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याच्या तसेच याबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. दर आठवड्याला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 50 टक्के सर्वेक्षण हे प्रतिसादात्मक व 50 टक्के सर्वेक्षण हे प्रतिबंधात्मक असायला हवे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी जनतेमध्ये याविषयी व्यापक स्वरूपात माहिती पोहचवावी जेणेकरून त्यांना काळजी घेता येईल असे सूचित केले. त्याचप्रमाणे मलेरिया, डेंग्यू अथवा इतर साथरोगांची लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात जाऊन त्वरित मोफत उपचार करून घ्यावयाचा आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम प्रभावीरित्या राबविण्यात येत असून नागरिकांनीही डास उत्पत्ती होऊ नये याकरिता काळजी घ्यावी तसेच डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी अथवा रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी व फवारणीसाठी घर, सोसायटी व परिसरात येणार्या महापालिका कर्मचार्यांना सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai