महिलेची हत्या

नवी मुंबई ः वाशी सेक्टर 30 परिसरात गोणीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला असून अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

पामबीच ते सेंटर वन मॉलकडे जाणार्‍या रस्त्याच्या ब्रिजखाली, इनऑर्बीट मॉलच्या मागील बाजूस सेक्टर 30 परिसरात गोणीमध्ये महिलेचा मृतदेह 2 ऑगस्ट रोजी आढळला. अज्ञात इसमाने धारधार शस्त्राने तिच्या गळ्यावर व शरिरावर जखमा करुन तिची हत्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत एका पोत्यामध्ये भरुन टाकण्यात आले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर महिलेचे वय अंदाजे 35 वर्षे असून तिने सफेद निळ्या हिरव्या रंगाच्या फुलांची डिझाईन असलेली साडी व पांढरा ब्लाऊज परिधान केला आहे. तिच्या उजव्या मनगटडावर राणीचा मुकुटाची डिझाइन गोंदलेली असून डाव्या हाताचे मनगटावर आतले बाजुस बदाम व ख्रिश्‍चन धर्मीय क्रासचे चिन्ह एकमेंकांना जोडलेल्या स्थितीत आहे. महिलेची ओळख पटली नसून वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.