मंदिर उघडण्यासाठी भाजपचा शंखनाद
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 30, 2021
- 682
नवी मुंबई ः कोरोना संबधी नियमात थोडी शिथीलता देण्यात आली आहे. मात्र यात धार्मिक स्थळे बंदच ठेवण्यात आली आहेत. मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून सोमवारी संपूर्ण राज्यात शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही भाजपकडून शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार’ अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली.
नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वात वाशी येथे इच्छापूर्ती गणपती मंदिरासमोर हे शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरे उघडण्यासाठी नवी मुंबई भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नवी मुंबईत ठिकठिकाणी शंख आणि घंटी वाजवून गणपती मंदिरासमोर आरती करुन हे आंदोलन केले. राज्य सरकारने मंदिराऐवजी बार उघडे केल्याने जनतेचे हाल तर ठाकरे सरकार मालामाल अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी लवकरात लवकर मंदिरे उघडावीत अशी मागणी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai