कोरोनानंतर गँगरीनचा त्रास
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 21, 2021
- 757
कोरोनामधून बाहेर पडल्यानंतर पाच रुग्णांना पित्ताशयामध्ये गँगरीन झाल्याचं आढळून आलं आहे. दिल्लीच्या पाच रुग्णांबाबत ही घटना घडली असून यात चार पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. या रुग्णांवर दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याबाबत डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की देशातली ही अशी पहिलीच घटना आहे. कोरोनावर मात केल्यानंतर रुग्ण गँगरीनशी लढत असून या पाचही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच रुग्णांचं वय 37 ते 75 वर्षांच्या दरम्यान आहे. हॉस्पिटलमधल्या लिव्हर आणि गॅस्ट्रोलॉजी इन्स्टिट्यूट विभागाचे प्राध्यापक डॉ.अनिल अरोरा म्हणतात, असे रुग्ण जून ते ऑगस्ट दरम्यान पाहिले गेले आहेत. पाचही रुग्णांच्या पित्ताच्या पिशव्या नेक्रोटिक होत्या. तात्काळ शस्त्रक्रियेमुळे त्यांचे प्राण वाचले.
डॉ.अनिल अरोरा म्हणतात की कोविडमधून बरं झाल्यानंतर रुग्णांच्या पित्ताशयामध्ये अधिक प्रमाणात सूज आली. ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनने रुग्णाच्या पित्ताशयामध्ये गँगरीनची पुष्टी केली. त्यामुळे त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक होती. या रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांना ताप, ओटीपोटात दुखणं आणि उलट्यांचा त्रास होत होता. पित्ताशयामध्ये गँगरीन असलेल्या पाच रुग्णांपैकी दोन मधुमेही आणि एक हृदयरोगी होता. कोविडच्या उपचारादरम्यान इतर तीनजणांना स्टिरॉइड्स देण्यात आली. त्यामुळे ताप, वेदना आणि उलट्या झाल्याची लक्षणं आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या पॅथॉलॉजी विभागातले डॉ. शशी धवन म्हणतात की कोविडमधून बरं झाल्यानंतरही शरीरातल्या बदलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. रुग्णांना ताप, शरीर दुखणं आणि उलट्या यासारखी लक्षणं दिसली तर वैद्यकीय चाचणी करावी आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण शर्मा म्हणतात, वेळेत गँगरीन झाल्याचं कळल्यास प्रतिजैविकांच्या मदतीने पित्ताशयाला होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai