Breaking News
मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. परंतु आता 4 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु करण्यास परवानगी मागितली होती. याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याने पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे.
दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसर्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शाळा सुरू करण्याबाबत नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष असणार आहे. आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai