मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 02, 2021
- 671
मुंबई ः मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवार 3 ऑक्टोबर 2021 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 पर्यंत (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील) पनवेल येथून सकाळी 10.49 ते सायंकाळी 04.01 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणार्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.03 ते दुपारी 03.16 या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणार्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
तसेच पनवेल येथून सकाळी 09.01 ते दुपारी 03.53 पर्यंत ठाण्याकरिता सुटणार्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. नेरूळ येथून सकाळी 10.15 ते दुपारी 02.45 या वेळेत खारकोपरला जाणारी डाउन मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.45 ते दुपारी 03.15 या वेळेत नेरूळसाठी खारकोपर सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीदरम्यान बेलापूर आणि खारकोपरदरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai