Breaking News
दोन आरोपींसह 22 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई : सीवूडस परिसरात घरफोडी करुन दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 25 लाखांचा ऐवज घेऊन पळून गेलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करून नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलिसांनी या घरफोडी प्रकरणाचा शोध लावला आहे. सदर गुन्ह्यामध्ये रोख रक्कम 20 लाख व 5 लाख 19 हजार किमंतीचे सोने-चांदिचे दागिने असा एकूण 25 लाख 19 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. यातील 22 लाख 20 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तागत केला आहे. त्याचबरोबर दोन आरोपींना अटक केली आहे.
एक आठवड्यापूर्वी सीवूड्स सेक्टर 44 मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चार सुरक्षा रक्षकांनी घरफोडीची योजना आखली होती. तिथे राहणारे जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. नंदलाल जैन यांच्या घरी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेले आरोपी नविन रतन विश्वकर्मा आणि कामी भक्ता गोरे हे मूळ नेपाळ येथील रहिवाशी आहेत. फिर्यादी संदीप जैन यांच्या तक्रारीवरून 24 तासात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी रोख रक्कम आणि सोने-चांदी अशा एकूण 25 लाख 19 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास करताना येथे दोन महिन्यांपासून सुरक्षारक्षकाची नोकरी करणारा नविन रतन विश्वकर्मा गायब झाला होता. त्याच्यावर संशय आल्याने पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या वॉमनची माहिती मिळवली. तो अभिलेखावरील सराईत गुन्हागार असल्याचे समोर आले. तांत्रिक पद्धतीने त्याचा शोध घेतला असता त्याला दहिसर मुंबई तर त्याचा साथीदार कामी भक्ता गोरे याला वडगाव, पुणे येथून ताब्यात घेतले. त्याच्यांकडून रोख रक्कम 14 लाख 28 हजार व 7 लाख 7 लाख 91 हजारांचे दागिने असा एकूण 22 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक चौकशीतून आरोपीविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने घरफोडी करण्याआधी आणि ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही फूटेजचा डीव्हीआरही काढून घेतले आणि नंतर घरफोडी केली. तसेच यांचे आणखी दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai