Breaking News
35 गुन्हे उघडकीस
पनवेल : नवी मुंबई येथील तळोजा खारघर परिसरात रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती. सदर प्रकाराने तेथील व्यापार्यांमध्ये असुरक्षितेची भावना झाली होती. अशावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी वेळोवेळी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी नामे आब्दुल सईदबकरीद खान वय 30 रा.ठी.15 नं गल्ली ,30 फूट रस्ता मंडाला मानखुर्द यास अटक केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 31 व मुंबई आयुक्तालयातील 4 असे एकूण 35 रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून इतिहास रचला आहे. अदयापपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी घरफोडीचे गुन्हे उघडण केल्याचे प्रथमच घडले आहे. त्यापैकी 27 गुन्ह्या मधील घटनास्थळ वरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचे चित्रण मिळाले आहे. या घरफोड्या करणार्या सराईत आरोपीस नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. आरोपीकडून 35 गुन्ह्यातील रु 13.22 लक्ष किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai