आयकर विभागाच्या धाडीने कांद्याचे दर घसरले
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2021
- 648
नवी मुंबई : केंद्राच्या आयकर विभागाने कांदा व्यापार्यांवर धाड टाकल्याने मुंबई एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात 15 रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 40 रुपये किलो विकला जाणारा कांदा आज 25 रुपये किलोने विकला जात आहे. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारात आज कांद्याची आवक 100 गाडी इतकी झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर कांदांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापार्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचार्यांनी या व्यापार्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल 80 अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास 18 तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे मार्केटमध्ये नियंत्रण आल्याची माहिती काही व्यापार्याने सांगितले.
अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. बदलत्या हवामानाचा फटका हा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यालाही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला आणि ऐन सणासुदीच्या काळात भाव वाढली त्यामुळे आयकर विभागातर्फे 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामुळे बाजार सध्या नियंत्रणात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai