नवी मुंबईत 50 बेड्सचे डायलिसीस सेंटर
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 17
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी
नवी मुंबई ः डायलिसीससाठी येणारा खर्च अवाजवी असल्याने तो सर्वसाधारण रुग्णाला परवडत नाही. ही परिस्थिती लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर 14 येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इमारतील 50 बेड्स क्षमतेचे स्पेशल डायलिसीस सेंटर सुरू केले आहे. एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने डायलिसिस बेड्स उपलब्ध असणारे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसिस सेंटर आहे. महापालिका आयुक्तांनी पाहणी करीत त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांना उपयोग व्हावा यादृष्टीने या डायलिसीस सेंटरची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण कार्यक्रमातील एनसीडी अभियान अंतर्गत हे 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या तपासणीव्दारे प्राधान्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग (स्तन, गर्भाशय, मुख), हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान करणे, त्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे असे सांगितले.
सध्या मधुमेहाचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसत असून त्यादृष्टीने डायलिसिसची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने या स्पेशल डायलेसिस सेंटरमध्ये एकाच छताखाली 50 तसेच महापालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात 10, नेरूळ रूग्णालयात 11, ऐरोली रूग्णालयात 11 तसेच सेक्टर 8 सीबीडी बेलापूर येथील सेंटरमध्ये 3 अशाप्रकारे एकूण 85 बेड्सची डायलिसीस सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यामुळे डायलिसीसची गरज असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला असून जानेवारीपासून सुरू केलेल्या या स्पेशल सेंटरचा लाभ आत्तापर्यंत 1 हजारहून अधिक डायलिसिस आवश्यक असणाऱ्या रूग्णांनी घेतला असल्याचे सांगितले.
वाशी सार्वजनिक रूग्णालयात एमआरआय व कॅथलॅब सुविधा तसेच सीएसएसडी, मॉड्युलस मॉर्च्युरी, मिल्क बँक अशाही महत्वाच्या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महानगरपालिका आरोग्य सुविधांच्या गुणवत्ता आणि क्षमता वाढीवर भर देत असून प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाचे आव्हान दूर करण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलली जात असल्याचे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai