पंचानेच केली एनसीबीची पोलखोल
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 30, 2021
- 477
नवी मुंबई येथील कारवाईवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई : राज्यात एनसीबीचे छापे सत्र सुरु असून याला राजकीय व धार्मिक वळणही लागले आहे. तसेच या कारवायांबाबत संशय व्यक्त होत असून बनावट कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच एनसीबीने खारघर येथे नायझेरियन विरोधात केलेली कारवाई बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांनी त्याचा उलगडा केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
आर्यन खान प्रकरणानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. त्यांच्या टिमने खारघर येथे केलेल्या कारवाईत पंच म्हणून असलेल्या खबर्याने ती कारवाई बनावट असल्याचे म्हंटले आहे. समीर वानखेडे यांच्यासाठी खबर्याचे काम करणार्या शेखर कांबळे यांनी त्याठिकाणी एक नायझेरियन व्यक्ती ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र कारवाईवेळी सदर नायझेरियन व्यक्तीने तिथून पळ काढला होता. यानंतर हे पथक एका ठिकाणी गेले असता, त्याठिकाणावरून दोन नायझेरियन व्यक्तींना पकडून एनसीबी कार्यालयात नेले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी कांबळे यांना कार्यालयात बोलावून पंच म्हणून कोर्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. यावेळी आपण कोर्या कागदावर सह्या घेत असल्याबाबत आक्षेप घेतला असता, काही होणार नाही याची हमी देण्यात आली होती. मात्र नुकतेच या कारवाईची माहिती उघड झाल्यानंतर पंच म्हणून आपला नोंदवलेला जबाब खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही ड्रग्स शिवाय पकडलेल्या व्यक्तीकडे 60 ग्रॅम एमडी सापडल्याचा जबाब सही घेतलेल्या कोर्या कागदावर नोंदवण्यात आल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने मंगळवारी रात्री एनसीबी कार्यालयातून अनिल माने यांनी फोन करून आपल्याला भेटीसाठी बोलावल्याचेही सांगितले. मात्र कारवाईचा बनाव उघड झाल्याने आपल्या जीविताला भीती असल्याने एनसीबी कार्यालयात जायचे टाळले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोपर खैरणे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला आहे. त्यामध्ये स्वतःला व कुटुंबाला पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai