Breaking News
पनवेल ः पनवेलसह नवीन पनवेल परिसरात इलेक्ट्रॉनिक केबलची चोरी करणार्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 17 लाख 63 हजार 146 रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासादरम्यान अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील चोरी या सदरखालील गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. बिपीन कुमार सिंह पोलीस आयुक्त, महेश घुर्ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी व गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी दिलेले आदेशाप्रमाणे मालमत्तेच्या संदर्भातील गुन्हयांचा समांतर तपास सुरु होता. वाशी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्हयाच्या तपासादरम्यान सपोनि खरोटे व अंमलदार पोहवा कोळी, पोना पाटील, जेजूरकर, जोशी, मोरे, फुलकर असे तळोजा परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना भारत वजन काटयाजवळ वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचे वर्णनाशी मिळता जुळता ईलेक्ट्रीक केबल ड्रम मोटार ट्रकमधून वाहतूक करित असताना आढळून आले. सदर पोलीस पथकाने मोटार ट्रक थांबवून त्यामधील राजपत राममिलन गौड याचेकडे सदर ट्रकमधील ईलेक्ट्रीक केबलचा बंडलबाबत चौकशी करता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल व अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचा ईलेक्ट्रीक केबलचा बंडल त्याचा साथीदार नामे शानू उर्फ हनिफ रा. शिवडी, मुंबई याचे सहाय्याने मनी मार्केट, वाशी नवी मुंबई येथून चोरी करुन ट्रकमध्ये ठेवला होता.
सदर चोरी केलेल्या मालाची विल्हेवाट लावेपयर्ंत सदरचा ट्रक तळोजा परिसरात पार्क करण्यास सांगून सदर मालाची विल्हेवाट लावणेकरिता घेवून जात असल्याचे आरोपीकडे केलेल्या चौकशी दरम्यान आढळून आले. त्यामुळे वाशी पोलीस ठाणेकडे चौकशी केली असता, सदरचा माल हा वर नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस अटक करण्यात आले असून जवळपास 17 लाख 63 हजार 146 रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये इतरही आरोपींचा सहभाग आहे. या आरोपींवर पनवेलसह वालीव, काशिमीरा आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर आरोपींचा तपास करण्यामध्ये कक्ष-03, गुन्हे शाखेचे वपोनि शत्रुघ्न माळी, सपोनि/ईशान खरोटे, सपोनि शेंडगे यांचेसह पोलीस अमलदार यांनी महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai