विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2021
- 649
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणार्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य सर्वश्री रामदास गंगाराम कदम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि गिरीषचंद्र बच्छराज व्यास (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सदस्यत्वाची मुदत समाप्त होत आहे. या 6 विधानपरिषदेच्या जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 14 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 16 नोव्हेंबर 2021
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक - 23 नोव्हेंबर 2021
नामनिर्देशन पत्रांची छाननी - 24 नोव्हेंबर 2021
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021
मतदानाचा दिनांक - 10 डिसेंबर 2021
मतदानाची वेळ - सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत,
मतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai