कोरोनामुळे 29 कोटी भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2021
- 932
मुंबई ः कोरोनामुळे सर्वसामान्यांचं आरोग्य धोक्यात आलंच पण कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरित परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनामुळे एकट्या भारतात 29 कोटी विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलं असून त्यापैकी 13 कोटी मुली आहेत. युनेस्कोने जारी केलेल्या अहवालातून या धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. युनेस्कोच्या मते, भारतातल्या शाळा सोडणार्या मुलींपैकी निम्म्याहून अधिक मुली पुन्हा शाळेत येत नाहीत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. यासोबतच कोरोनामुळे पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील 11 कोटींहून अधिक मुलं अद्याप शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या जगातल्या मुलांपैकी जवळपास 7.5 टक्के मुलं भारतात आहेत.
- शाळा बंद चा विविध देशातील कालावधी
भारतात जवळपास 73 आठवडे शाळा बंद होत्या.
ब्राझीलमध्ये 69 आठवडे शाळा बंद
अमेरिकेत 62 तर पाकिस्तानमध्ये 60 आठवडे शाळा बंद
चीनमध्ये 27 आणि रशियामध्ये 13 आठवडे शाळा बंद होत्या.
भारतात सर्वाधिक काळ शाळा बंद असल्यामुळे 29 कोटी मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम
यात 15 कोटी मुलं आणि 14 कोटी मुलींचा समावेश
- 2019-20 या शैक्षणिक वर्षातली आकडेवारी
ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेशमध्ये शिक्षण अर्धवट सोडणार्या मुलांची संख्या सर्वाधिक असून पंजाबमधला आकडा सर्वात कमी आहे.
देशभरात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शाळा सोडणार्या मुलांच्या संख्येत मोठी वाढ
त्रिपुरा, आसाम, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँड या राज्यांमध्ये माध्यमिक स्तरावरील शाळा सोडणार्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली
- शाळा बंदचा परिणाम
दर सातपैकी एका विद्यार्थ्याच्या शालेय शिक्षणाच्या कालावधीतले तीन महिने कमी झाले
मुलींना जास्त फटका
भविष्यात लिंगभेद वाढीस लागण्याची भीती
पाच महिने शाळा बंद राहिल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यातल्या वार्षिक कमाईत 64,000 रुपयांची घट होण्याची शक्यता
भारतात शाळा सोडणार्या एकूण मुलींपैकी 53 टक्के मुली पुन्हा शाळेत येत नाहीत.
आताही 12 ते 17 या वयोगटातल्या शाळा सोडणार्या एक कोटी मुली पुन्हा शाळेत परतणार नाहीत.
या सगळ्याचे भविष्यात फार गंभीर परिणाम
शिक्षणाच्या अभावामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता
तसंच शिक्षणाचा अभाव हे लोकसंख्यावाढीचं कारण ठरू शकतं.
शाळा सोडलेल्या मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न आवश्यक
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai