वैद्यकीय क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करावेत
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 16, 2021
- 564
मुंबई : कोव्हिडनंतर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.कानिटकर यांनी येणार्या काळात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे वेगवेगळे प्रकल्प, भविष्यात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि कोविडनंतर वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम यासंदर्भात चर्चा केली. लवकरच विद्यापीठामार्फत भविष्यकालीन आराखडा सादर करण्यात येईल, असेही डॉ.कानिटकर यांनी यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांना सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai