आफ्रिकन मलावी आंब्याची एपीएमसीत आवक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2021
- 559
नवी मुंबई ः हापुस आंबा म्हटले की आठवते ते कोकण. मात्र आता विकसीत तंत्रज्ञानामुळे हापुस आंब्या प्रमाणेच परदेशी आंबे देखील बाजारात दाखल होत आहेत. सध्या एपीएमसीत आफ्रिकन मलावी आंब्याची आवक सुरु झाली आहे. 1200 ते 1500 रुपये किलो दराने या आंब्याची विक्रि होत आहे.
दरवर्षी कोकणातून एपीएमसी बाजारात व देशाच्या इतर भागात कोकणातील हापुस आंबा विक्रीसाठी येतो. तसेच परदेशात देखील हापुस आंबा पाठवला जातो. मात्र हापुस आंबा बाजारात दाखल होण्याकरिता अजून तीन ते चार महिन्याचा कालावधी बाकी असताना वाशीतील एपीएमसी बाजारात आफ्रिकन आंब्याची आवक झाली आहे. आफ्रिकेमधील मलावी देशात हापूस आंब्याचे उत्पादन काढण्यात आले आहे. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध असल्याने खवय्यांना सुवर्णसंधी आहे. मलावी मधील 600 हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. 10 वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून 40 हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावी मध्ये नेल्या होत्या. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारना चांगली झाली असून मोठ्या प्रमाणत आंब्याचे उत्पादन झाले आहे . त्यामुळे पुढील तीन चार महिने अफ्रिकन हापूस एपीएमसी मध्ये आवक सुरू राहणार आहे. शुक्रवारी 270पेट्या(बॉक्स)पहिली खेप वाशी बाजारात दाखल झाली असून 1200 ते 1500रु प्रति बॉक्स अशी किंमत या आंब्याची आहे. 15 डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai