पनवेलमधील लॉजवर गुन्हे शाखेचा छापा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 28
अनैतिक व्यवसायातून दोन पीडित महिलांची सुटका; लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटक
नवी मुंबई ः नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पनवेलमधील शिरढोण येथील हॉटेल क्रांतिवीर लॉजिंग अँड बोर्डिंगवर धडक कारवाई करत अनैतिक व्यवसायातून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉज व्यवस्थापक, महिला पुरवठादार आणि वेटर अशा तिघांना अटक करण्यात आली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांच्या निर्देशानुसार अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना 3 ऑगस्ट रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, शिरढोण येथील संबंधित लॉजमध्ये महिलांना ठेवून अनैतिक व्यवसाय चालविला जात आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला. त्याच्या सांकेतिक इशाऱ्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकत कारवाई केली. छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तपासात लॉज व्यवस्थापक प्रकाश गणेश गुप्ता, महिला पुरवठादार अजगर फकीर शेख आणि वेटर प्रियरंजन लालोराय कुमार राय यांनी महिलांना लॉजमध्ये ठेवून ग्राहक उपलब्ध करून देत अनैतिक व्यवसाय चालविल्याचे निष्पन्न झाले. बनावट ग्राहकाकडून 5 हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्यात आल्याचेही उघड झाले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai