Breaking News
चिपळूणचा ह्या रहिवास्याला, मुंबईला येऊन आपण खरंच इतका धुडगूस घालू, आपलं स्थान निर्माण करू ह्याची क्वचितच कल्पना असावी. हा चिपळूणकर म्हणजेच ओंकार भोजने, ज्याचे प्रत्येक स्किट आज वाजतय आणि गाजतय. त्याची सुरवात तशी चिपळूणलाच झाली होती, छोट्या नाटिका, एकांकिका वगैरे करतच तो महाराष्ट्राची हास्या जत्रा ह्या प्रसिद्ध शो चा हिसा झाला. काम सुरु होतच पण ओळख सापडत नव्हती. अत्यंत चिकाटीने आणि हुशारीने त्याने आपले प्रयत्न सुरुं ठेवले. मधे एक काळ आसा ही आला जिथे तो शो चा भाग नव्हता. पण मग अचानक त्याची एंट्री झाली आणि तिथून पुढे आजतागत त्याने मागे वळून पाहीले नाही. काहीतरी वेगळी जादूच झाली आणि ओंकार हा चर्चेचा विषय झाला. त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखा अगदी त्याच्यामुळे नावारूपास आल्या, आठवणीत राहिल्या आणि त्या गाजल्या. अगं अगं आई... म्हणत त्याने आपली मनं जिंकली अन एखादा उद्योगी किती निरागस असू शकतो हे पटवून दिलं. इलेक्ट्रीशियन तात्या हे त्याचे दसूरे गाजलेले पात्र. ह्या भूमिकेने जवळजवळ धिंगाणा घातला. तात्याच्या चाली बोली पासुन ते त्याच्या हातवार्यांपर्यंत सगळच इतक अभासपुर्वक केल गेलं की प्रेक्षकांनी तात्याला अगदीच डोक्यावर घेतलं. ऑर्केस्ट्रा मधला गायक निव्वळ धम्माल होता तर फडावर आलेला भाई तितकाच तिरकस. ओंकारने साकारलेला आधूनिक यम असो किंवा दूकानदार असो, भविष्य सांगणारा बाबा असो किंवा डायरेक्टर असो ही सगळी पात्र आपली छाप पाडून जातात.
गच्ची वर बसुन मित्रांसोबत गटारी साजरी करातानाचा ओंकार आणि बायको सोबत गटारीचे नियोजन करतानाचा ओंकार हयात कुठेही साम्य नाही हे निवळ त्याचं कौशल्य आहे. गौरवचा मामा हे जे काही गणित जमले त्याला तोडच नाही...क्रिकेट खेळताना बायकोवर रागावणारा आणि आईचं नाव घेतलं म्हणून आऊट होणारा हा हरहुन्नरी कलाकार म्हणजेच आपला ओंकार. नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करताना स्वतःला सिद्ध करणे आणि एक वेगळी छाप उमटवणे ही इतकी अवघड गोष्ट तो अगदी सहज आणि रोज करतो. हास्यजत्रेच्या आजच्या यशाचं श्रेय जितके इतरांना जाते तितकेच ते ओंकारला ही जाते कारण सातत्याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं, काहीतरी नवीन करणं आणि ते अगदी सहजपणे समोर पोहचवण हे सोपं नव्हे. अदाकारी तर आहेच पण आता त्यात त्याच्या गाण्याची भर पडली आहे. लोकांना अक्षरशः वेड लावलय ते ओंकारच्या गाण्याने. त्याने स्वतः लिहिल्या, गायलेल्या गाण्यांचा एक वेगळा प्रेक्षक तयार झालाय. सोशल मीडीयावर ओंकारचे हजारो चाहते रोज आपली मतं मांडत असतात. त्याने अजुन खुप छान काम करावं म्हणुन त्याला शुभेच्छा देत असतात. एवढे यश मिळूनही, आणि त्याची कल्पना असुनही ओंकार अगदीच सरळ, साधा आणि आपल्यातला वाटतो. त्याच्या प्रत्येक मुलाखतीत त्याचं मनोगत ऐकताना किंचीतही गर्व, सेलिब्रिटीपण वैगैरे असं काहीही त्याला शिवलेला नाही हे दिसून येते.
- मीरा पितळे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai