Breaking News
वाराणसी ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन करण्यात आले. औरंगजेबाच्या अत्याचार आणि त्याच्या दहशतीची ही नगरी साक्षीदार आहे. ज्याने तलवारीच्या जोरावर इथली सभ्यता बदलण्याचा प्रयत्न केला, ज्याने संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला, पण या देशाची माती जगापेक्षा वेगळू आहे. या भूमीत जेव्हा औरंगजेबचा अत्याचार वाढतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही उभे ठाकतात. एखादा सालार मसूद येतो तेव्हा राजा सुहेलदेवसारखे वीर योद्धा आपल्या एकतेची जाणीव करुन देतात, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.
काशी ही शब्दांची नसून ती भावनांची निर्मिती आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काशी म्हणजे जीवन आहे, काशी म्हणजे प्रेमाची परंपरा आहे, काशी ती आहे जिथे सत्य हेच संस्कार आहेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदी म्हणाले की, काशी तर काशी आहे! काशी तर अविनाशी आहे. काशीमध्ये एकच सरकार आहे, ज्याच्या हातात डमरु आहे, त्याचंचं सरकार आहे. जिथे गंगा आपला प्रवाह बदलून वाहते, त्या काशी कोण रोखू शकतं? पंतप्रधान म्हणाले की, काशी विश्वनाथ मंदिर परिसर जे केवळ 3000 चौरस फुटांचं होतं, आता जवळपास 5 लाख चौरस फुटांचं झालं आहे. आता 50,000 ते 75,000 भक्त मंदिर आणि परिसरात येऊ शकणार आहेत. भगवान विश्वेश्वराच्या आशीर्वादाने, येथे आल्याबरोबर एक अलौकिक ऊर्जा आपल्या अंतर्मनाला जागृत करते.
मजुरांवर केला पुष्पवर्षाव
पंतप्रधान मोदींनी कॉरिडॉरच्या बांधकामात काम करणार्या मजुरांवर पुष्पवृष्टी केली. पंतप्रधानांनी मजुरांसोबत फोटोही काढला. यावेळी कामगार खूप आनंदी दिसत होते. पंतप्रधानांनीही सर्वांशी संवाद साधला. त्यांची तब्येत विचारून बांधकामाच्या कामात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai