‘गो इलेक्ट्रिक’ रोड शोला उत्स्फुर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 14, 2021
- 913
नवी मुंबई : वाढत्या प्रदुषणाला आळा घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्युत वाहनांचा वापर फार महत्वाचा आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी महावितरण व ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएनसी(बीईई) तर्फे वाशी येथे ‘गो इलेक्ट्रिक’ रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी रोड शोला हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा प्रारंभ केला. वाशी रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेली हा शो वाशी सेक्टर 17 मार्गे शिवाजी चौक (वाशी बस डेपो), सेक्टर 9, हॉटेल ब्लु डायमंड, पाम बीच गेलेरिया मॉल, अरेंजा कॉर्नर, एपीएमसी माफको, सानपाडा स्टेशन मार्गे परत वाशी स्टेशनलगत तुंगा हॉटेल समोर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रोड शो मध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, एम जी मोटर, कोना, हिरो, अथेर, इट्रीओ, डेल्टा, बी गौस या कंपन्यांची विजेवर चालणारी वाहने सहभागी झाली असून एनएमएमसीची 5 इलेक्ट्रिक बसेस, 40 युलू बाईक्स, तसेच 1,2,3 व 4 चाकी इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होता. पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक आहे. महावितरणकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्ससाठी अत्यंत माफक दरात वीज उपलब्ध आहे. पारंपरिक इंधनासह देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पर्यावरणस्नेही झाले पाहिजे, असे आवाहन या इलेक्ट्रिक व्हेहीकल रोड शोचे उद्घाटन करतांना महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी केले. कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन वापरणार्या लोकांना राज्य शासन व केंद्र शासनाने दिलेल्या अनेक सवलती दिलेल्या आहेत. राज्य शासनाचे ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021’ मध्ये चार्जिंग स्टेशनची उपलब्धता वाढविण्यात येणार असून सदर धोरणाद्वारे राज्य सरकारने महावितरण कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन पुरविण्यासाठी नोडल एजेन्सी म्हणून नियुक्त केले आहे. या कार्यक्रमात पथनाट्यद्वारे महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी पर्यावरण संरक्षण व त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग याबद्दल एक सुंदर पथनाट्य सादर केले. याप्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशम, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं) भारत जाडकर व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, भांडुप परिमंडलातील आजी माजी नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिकाचे वरिष्ठ अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai