दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 17, 2021
- 964
मुंबई : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे. शिवाय या परिक्षा ऑफलाईनच होणार असून सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
कोरोनामुळे गत वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. ऑक्टोबर 2021 पासून शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा व महाविद्यालये सुरु केली आहेत. आता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागणे महत्त्वाचे आहे. बारावीची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहेत. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असून प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. 25 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. या परीक्षा कशा होणार केंद्र कोणती असणार? कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा कशा होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai