मिस अँड मिसेस मेसमेरिक क्विन इंडिया 2021 दिमाखात संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2021
- 840
नवी मुंबई ः मिस अँड मिसेस मेसमेरिक क्विन इंडिया 2021 ही सौंदर्यस्पर्धा 19 डिसेंबर रोजी वाशी येथील सिडको सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाली. यामध्ये मिस या श्रेणीमध्ये आयुषी गौतम तर मिसेस प्रीमियम श्रेणीत राधिका ठक्कर यांनी विजयाचा मुकूट मिळवला. तसेच मिसेस क्लासिक श्रेणीत रितिका बन्सल हिने मुकुटावर आपले नाव कोरले.
गुरमित गारा ग्रुमिंग स्कुल यांच्या वतीने या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मिस्टर वर्ल्ड 2016 ठरलेला अभिनेता व मॉडेल रोहीत खंडेलवाल याने ज्या सौंदर्यवतींना फॅशनचे धडे दिलेत त्यांनी अंतिम फेरीत आपल्या सौंदर्य व बुद्धिमत्तेने सर्वांची मने जिंकली. ही स्पर्धा मिस, मिसेस (प्रीमियम व क्लासिक) या श्रेणीत पार पडली. मिस या श्रेणीमध्ये आयुषी गौतम ही विजयी तर तनिष्का शेट्टी, आरुषी सिंग या उपविजेत्या ठरल्या. विवाहित महिलांच्या प्रीमियम श्रेणीत राधिका ठक्कर हि विजेती तर उप विजेती म्हणून सोनल शहा व प्रियंका थोरात या जिंकल्या. क्लासिक श्रेणीत रितिका बन्सल हिने मुकुटावर आपले नाव कोरले तर उपविजत्या म्हणून मोनाली जगताप आणि झैबुन्निसा शेख यांनी स्पर्धा जिंकत स्वतःला सिद्ध केले. या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना आयोजक गुरुमित गारा यांनी सांगितले कि हि स्पर्धा यशस्वी होण्याकरिता स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली, सौंदर्यस्पर्धा आत्मविश्वास सिद्ध करण्याची असते. ज्या मध्ये सहभागी सर्वच स्पर्धकांनी आपल्या परीने स्वतःला सिद्ध केले. भविष्यात स्पर्धा देशाच्या कानाकोपर्यात आयोजित करण्यात येईल आणि मुंबईमध्ये होणार्या अंतिम फेरीत देश पातळीवरील स्पर्धकांना जिंकण्याची संधी मिळेल.
परीक्षक म्हणून डॉ. संजीव कुमार, डॉ. संगीता दिवेकर, यामिनी डोगरा कांग, सुमित दासगुप्ता ,ख्रिस्तटॉप कौटेटर्स आणि अशोक मेहरा यांनी जबाबदारी पार पाडली. क्रिएटिव्ह डिरेक्टर पाहूलदीप गारा, रनवे डिरेक्टर दिनेश राजपुरोहित, डिझाइनर आयएनआयएफडी पनवेल तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश मिराजकर यांनी करत कार्यक्रमात अधिकच रंगत भरली. या वेळी डॉ.विजय शुक्ला, मुख्य प्रायोजक ड्रीम्स मेकर्स च्या सौम्या सिंग, प्रो ऍक्टिव्ह शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे कॅप्टन प्रसन्नजीत कुमार, चित्रपट निर्माते संदीप नगराळे, लाफी पॉल, सिंधू नायर, विकेश कुमार (एक्सडी फोकल) व इतर मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai