एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या सोडविणार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 21, 2021
- 763
महावितरण अधिकार्यांसोबत बैठकीत सकारात्मक चर्चा
तळोजा ः तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि महावितरण यांची संयुक्त बैठक हॉटेल तनिश रेसिडेन्सी येथे 18 डिसेंबर रोजी संपन्न झाली. उद्योजकांना महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि महावितरणशी संबंधित असलेल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी त्यांना विद्युत विषयक असलेल्या समस्या व प्रश्न मांडून महावितरणच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योजकांनी विविध समस्या मांडल्या असून त्या सोडविण्यासाठी महावितरणसोबत सकारात्मक चर्चा झाली. तळोजा उद्योग क्षेत्रात त्वरित अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर आणि खांब लावण्यात यावे, युटिलिटी वाहन देण्यात यावी, उद्योग आणि स्थानिक गाव पेंढार, देवीचापाडा मधील विद्युत पुरवठा विभक्त करण्यात यावे, वीज गळती कमी करण्यात यावी, परिसरात वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावे, जुने गंजलेले खांब आणि फीडर पिलर बॉक्स बदलण्यात यावे या समस्या उद्योजकांनी मांडून त्याचे निराकरण करण्याची विनंती केली. अपग्रेडेशन प्रकल्पाविषयी माहिती देत महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले, तळोजा औध्योगिक क्षेत्रासाठी 10 कोटी मूल्याचे निविदा आधीच काढल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर महावितरणचे सहाय्यक अभियंता-तळोजा औध्योगिग क्षेत्राच्या कार्यालयात 5 सुटे ट्रान्सफॉर्मर सदैव उपलब्ध असतील असे आश्वासन दिले आणि लवकरच युटिलिटी वाहन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योगाला वीज पुरवठा खंडित होतो अशा ठिकाणांचे सविस्तर सर्वेक्षण करण्याचे आणि योग्य स्तरावर त्वरित दुरुस्ती करण्याचेही त्यांनी मान्य केले. तसेच सर्व उद्योगांनी बिले तातडीने भरावीत अशीही विनंती त्यांनी केली.
या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता राजाराम माने, कार्यकारी अभियंता सतीश सरसोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बायकर, सहाय्यक अभियंता आदित्य धांडे, सहाय्यक अभियंता कुणाल आंबटकर, टीआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी (अण्णा), उपाध्यक्ष बाबू जॉर्ज, सचिव रोहित बन्सल, कोषाध्यक्ष बिनीत सालियन, सरचिटणीस बिदुर भट्टाचार्जी, कार्यकारी सचिव सुनील पाधीहारी तसेच तळोजा एमआयडीसी मधील एक्साइड इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक, फोर्स्टार फ्रोझन फूड्स इत्यादी सर्व क्षेत्रातील अनेक औद्योगिक प्रतिनिधी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai