खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वसाहत सेवा शुल्क आता ऑनलाईन

नवी मुंबई ः सिडकोच्या वसाहत विभागांशी संबंधित सेवा अधिक चांगल्या प्रकारे, कार्यक्षम व पारदर्शकरित्या देता याव्यात या उद्देशाने या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. 

कोपास प्रणालीच्या बांधकाम परवानासंबंधी शुल्क ऑनलाईन भरण्याच्या सुविधेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वसाहत विभागांच्या हस्तांतरण, तारण ना हरकत प्रमाणपत्र, मुदतवाढ, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक, तात्पुरत्या परवानग्या इ. साठीचे शुल्क देखील ऑनलाईन भरता यावे अशी सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर सुविधा 2 जुलै 2018 पासून सुरू करण्यात येत आहे. सिडकोच्या नागरी सुविधा केंद्रावर ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणार्‍या नागरिकांना आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन शुल्क अदा करण्याचे पर्याय उपलब्ध असतील.

तसेच विविध भागधारकांची सिडकोच्या सर्व शुल्कांचे भुगतान डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्याची पध्दत बंद करण्यात यावी ही बराच काळ प्रलंबित असलेली मागणी सिडको महामंडळातर्फे मान्य करण्यात आली आहे. ऑनलाईन शुल्क भरणा प्रक्रियेमुळे अर्जदारांचा बँकेत वाया जाणारा वेळ, डिमांड ड्राफ्टसाठी भरावे लागणारे शुल्क आणि सिडको कार्यालयात येण्या-जाण्याचा त्रास, या सर्व गोष्टी टळणार आहेत. ऑनलाईन शुल्क भरणा सुविधेमुळे नागरिकांना वसाहत संबंधी सेवांसाठी सिडकोच्या कार्यालयात येण्याची गरज उरणार नाही. आवश्यक असलेली प्रमाणपत्रे देखील त्यांना ऑनलाईन प्राप्त होतील. सिडकोने आर्थिक व्यवहार जलदगतीने होऊन वसाहत संबंधी सेवा अधिक तत्परतेने पुरवता याव्यात यासाठी इंडसइंड बँकेशी सहकार्य करून सदर सुविधांचा पेमेन्ट गेटवे सॅप प्रणालीशी जोडण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट