ओटीटी वाहिन्यांचं प्राईस वॉर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 25, 2021
- 659
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये ओटीटी वाहिन्यांची ऍप्सही आहेत. कोरोनाकाळात ही ओटीटी व्यासपीठं हेच मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम होतं आणि आज सर्व व्यवहार सुरळीत होत असताना ओटीटी वाहिन्यांची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. आज अनेक चित्रपट ओटीटी वाहिन्यांवर प्रदर्शित होत आहेत.
वैविध्यपूर्ण विषय मांडणार्या वेब सिरिजनी तरुणाईवर भुरळ पाडली आहे. मध्यंतरी टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईलच्या प्रीपेड योजनांच्या दरात वाढ केली. एअरटेल, व्हीआयनंतर जिओनेही दरवाढ केली. त्यानंतर ग्राहक प्रत्येक कंपनीच्या योजनांची तुलना करून स्वस्त योजनेची निवड करू लागले. ओटीटी वाहिन्यांबाबतही असंच म्हणावं लागेल. कारण या वाहिन्यांमध्येही आता किंमतीवरून चढाओढ पहायला मिळत आहे.
कोणती योजना आहे स्वस्त?
- नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने हॉटस्टार या देशातल्या प्रमुख ओटीटी वाहिन्या आहेत. आता या तीन ओटीटी वाहिन्यांच्या योजनांची तुलना करणं उत्सुकतेचं ठरू शकतं.
- मध्यंतरी ऍमेझॉन प्राईमने आपल्या सदस्यत्व योजनांच्या किंमतींमध्ये 50 ते 500 रुपयांची वाढ केली तर दुसरीकडे नेटफ्लिक्सने भारतातल्या सदस्यत्व योजनांच्या किंमती घटवल्या. नेटफ्लिक्सची मासिक सदस्यत्व योजनेची किंमत फक्त 149 रुपये आहे. तसंच अन्य योजनांच्या किंमतीही घटल्या आहेत. डिस्ने हॉटस्टारने या वर्षाच्या सुरूवातीलाच आपल्या योजनांमध्ये काही बदल केले होते.
- नेटफ्लिक्सने आपल्या सर्वच्या सर्व म्हणजे चारही योजनांच्या किंमती घटवल्या आहेत. त्यांच्या प्राथमिक ओन्ली मोबाईल मासिक योजनेची किंमत 149 रुपये आहे. ही योजना घेतल्यास मोबाईल किंवा टॅबलेटवर नेटफ्लिक्सचे कार्यक्रम बघता येतील. नेटफ्लिक्सचे कार्यक्रम आपल्या कॉम्प्युटरवर बघण्याची इच्छा असणार्यांना मासिक 199 रुपये भरावे लागतील. 499 रुपये मासिक योजना घेतल्यास नेटफ्लिक्सचे कार्यक्रम दोन डिव्हाइसवर बघता येतील तर मासिक 649 रुपये योजनेद्वारे चार डिव्हाइसवर फोरके एचडीआर व्हिडिओ बघता येतील.
- डिस्ने हॉटस्टारच्या तीन योजना असून प्राथमिक सदस्यत्व योजनेची सुरूवात 499 रुपयांपासून होते. ही योजना घेतल्यास या वाहिनीचे कार्यक्रम स्मार्टफोनवर बघता येतील. वार्षिक 899 रुपये किंमतीची योजना घेतल्यास एकाच वेळी दोन डिव्हाइसवर कार्यक़्रम बघता येतील. या वाहिनीची प्रिमियम योजना असून यासाठी वर्षाला 1499 रुपये भरावे लागतील. एवढ्या किंमतीत एकूण चार डिव्हाइसवर कार्यक्रम बघता येतील.
- ऍमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना प्राईम व्हिडिओसाठी वेगळं शुल्क भरावं लागत नाही. याच्या वार्षिक योजनेची किंमत 1499 रुपये असून मासिक योजनेसाठी 179 रुपये आणि त्रैमासिक योजनेसाठी 459 रुपये भरावे लागतील. ऍमेझॉन प्राईमचं सदस्यत्व घेतल्यास सदस्यांना प्राईम म्युझिक आणि प्राईम व्हिडिओसह प्राईम शॉपिंगची सुविधाही मिळते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai