शेकापची स्वच्छता मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 29, 2021
- 517
जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा पुढाकार
नवीन पनवेल : आमदार बबाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील सिडकोतर्फे आरक्षित प्लॉट स्वच्छ करून देण्यात आला. सदर प्लॉटवर साचलेले डेब्रिज आणि वाढलेली झाडे झुडपे साफ करून लहान मुले आणि तरुणांसाठी खेळाचे मैदान करून देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शे.का.प. खांदा कॉलनी कार्याध्यक्ष योगेश कोठेकर यांनी केले होते.
याप्रसंगी बोलताना शे.का.प. अध्यक्ष खांदा कॉलनी अनिल बंडगर म्हणाले की यापुढेही आम्ही खांदा कॉलनी मधील आवश्यक ते सिडकोचे मैदानासाठीचे आरक्षित प्लॉट नागरिकांच्या मागणीनुसार शेकाप आणि विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून स्वच्छ करून देणार आहोत याचा शुभारंभ आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे. कामोठे मधील शे.का.प. नेते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश खरात आणि शे.का.प. शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांच्या नियोजनाखाली कामोठे मध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आली. त्या मोहिमेत सिडकोचे रिकामी प्लॉट नागरिकांच्या मागणीनुसार स्वच्छ करून देण्यात आले जेणेकरून त्या प्लॉटवर साचलेली घाण आणि वाढलेले झाडे-झुडपे साफ झाल्यामुळे मच्छरांचा त्रास यापुढे नागरिकांना होणार नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गातून आभार मानण्यात आले. उलवे नोड 2, सेक्टर 17 येथेही स्वच्छता मोहिमेचे आयोजन 26 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. येथेही गार्डन प्लॉट स्वच्छ करून नागरिकांना खुले करून देण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai