Breaking News
तीघांना अटक ; अडीच किलो एमडी पावडर हस्तगत
नवी मुंबई ः 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी तरुणांना ड्रग्स पुरविणार्या आरोपीला दोन साथीदारांसह गुन्हे शाखा, अमंलीपदार्थ विरोध कक्ष व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कोटी 53 लाख 70 हजारांचे अडीज किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. नशामुक्त नवी मुंबई अभियानाच्या अनुषंगाने अमलीपदार्थ खरेदीविक्रि व व्यसन करणार्यांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने ड्रग्स माफियांचा शोध घेण्यात येत होता. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष 3, अमंलीपदार्थ विरोध कक्ष व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी तरुणांना ड्रग्स विकण्यासाठी आलेल्या कलीम रफिक खामकर (39), रा. पनवेल याला नेरे परिसरातून अमंलीपदार्थांसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासातून त्याचे सहकारी जकीअफरोज पिट्टु (33)रा. पनवेल व सुभाष रघुपती पाटील (40) रा. पेण यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 कोटी 53 लाख 70 हजार रुपयांचेे 2 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. सदर आरोपींनी एमडी पावडर बनविण्याकरिता पोयनाड, ता.अलिबाग येथे फॅक्टरी सुरु केली होती. तेथे ही पावडर बनविण्याची ड्रायर मशिनसह 500 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. सदर फॅक्टरी पोलीसांनी सील केली आहे. सदर आरोपीविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai