कसं असावं 2022 चं अर्थनियोजन?
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2022
- 807
आता आपण 2022 मध्ये प्रवेश केला आहे. नवं वर्षं सुरू झालं आहे. नव्या वर्षाचे संकल्प करताना अर्थनियोजन हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कोरोनाच्या दोन वर्षांनी आपल्याला बरंच काही शिकवलं. यातून योग्य तो धडा घेऊन आपण आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरूवात करायला हवी.
- आर्थिक उद्दिष्ट ठरवणं सर्वात महत्त्वाचं आहे. मुलांचं शिक्षण, लग्न, निवृत्तीनंतरचं अर्थनियोजन, घरखरेदी, वाहनखरेदी अशी अनेक आर्थिक उद्दिष्टं आपल्यासमोर असतात आणि त्या दृष्टीने पैसा जमवणं गरजेचं असतं. आर्थिक उद्दिष्टांचे प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने पुढे जाणंही आवश्यक असतं. ऑनलाईन सिप कॅलक्युलेटर्सच्या मदतीने कोणत्या आर्थिक उद्दिष्टासाठी किती रक्कम गुंतवावी लागेल, हे ठरवता येतं. त्यामुळे प्रत्येक महिन्यात किती बचत करावी लागेल आणि कोणत्या खर्चांना कात्री लावावी लागेल, हे ठरवणं सोपं जाईल.
- कोरोनाकाळाने आपल्याला बचतीचं महत्त्व पटवून दिलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बचत करायला हवी. बचतीची सुरूवात करताना दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवावी. सुरूवातीला ही रक्कम फार वाटली नाही तरी ठराविक काळानंतर बराच निधी साठलेला असेल. त्यातूनच थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा प्रत्यय येईल. पुरेशी बचत केल्यानंतर त्याचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठीही करता येईल. खर्चावर नियंत्रण आणणं हा बचतीचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. अनावश्यक खरेदी टाळून आपण खर्च कमी करू शकतो. त्या अनुषंगाने उत्पन्नातली दहा टक्के रक्कम बाजूला ठेवावी.
- पैसा वाढवायचा तर गुंतवणूक करायला हवी. त्यासाठी शेअर्स खरेदी करता येतात. शेअर बाजाराचा अनुभव नसेल किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं वाटत असेल तर म्युच्युअल फंडांचा पर्याय निवडता येतो. आज गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे नीट संशोधन करून मगच पैसे गुंतवावेत.
- आपल्याकडे तीन ते सहा महिने पुरेल एवढा आपत्कालीन निधी हवा. नोकरी जाणं, आजारपण किंवा अन्य आर्थिक अडचणीच्या काळात हा निधी उपयोगी पडू शकतो.
- कर्जाचा बोजा शक्य तितका कमी करावा. कर्जाच्या ओझ्याखाली सुखी आणि आनंदी जीवन जगता येत नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड वेळेत करावी. कर्ज साठू देऊ नये.
- क्रेडिट स्कोअरकडे लक्ष ठेवावं. उत्तम क्रेडिट स्कोअर आपल्या आर्थिक आरोग्याचं प्रतीक असतो. भविष्यात कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर उपयोगी पडू शकतो.
- विमा पॉलिसी घेणंही आवश्यक आहे. आरोग्य तसंच जीवन विमा पॉलिसी घ्यायला हवी. जीवन विमा पॉलिसी घेताना पॉलिसीची रक्कम वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15 पट असायला हवी. अर्थात बरेच जण विमा पॉलिसी आणि गुंतवणूक यात गल्लत करतात आणि युलिप्स, मनीबॅक पॉलिसी, एन्डॉवमेंट पॉलिसी घेतात. या पॉलिसी खूप कमी विमा संरक्षण देतात. ऑनलाईन टर्म जीवन विमा पॉलिसी हा कमी हप्त्यात भरपूर विमा संरक्षण मिळवून देणारा उत्तम पर्याय ठरू शकतो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai