Breaking News
नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या होण्यापुर्वी काही तास आगोदर त्या मुख्य आरोपी अभय कुरूंदकर याला ठाणे शहरात भेटल्यानंतर सायंकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये चहा घेतला. नंतर ते दोघे चारचाकी गाडीतून मीरारोड येथे गेले, असे दोघांकडे असलेल्या एमटीएमएलच्या मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट झाले आहे. एमटीएनएलच्या नोडल अधिकार्यांनी शुक्रवारी पनवेल न्यायालयात ठाणे शहरापासून ते मीरा रोडपर्यंतच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
पनवेल न्यायालयाच्या जिल्हा सत्र न्यायाधिश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात शुक्रवारी एमटीएनएलचे निवृत्त नोडल अधिकारी धोत्रे यांनी आपली साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील ऍड प्रदीप घरत यांनी धोत्रे यांची सर तपासणी घेतली. कोविडच्या नवीन नियमावलीनुसार न्यायालयाचे कामकाज फक्त दुपारी एक वाजेपर्यंत चालले. त्यामुळे धोत्रे यांची उलट तपासणी झाली नसून ती पुढील तारखेला आरोपीचे वकील विशाल भानुशाली हे घेणार आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरूंदकर, कुंदन भंडारी यांच्यासह अश्विनी बिद्रे याही एमटीएनएलच्या मोबाईलचा वापर करीत होत्या. त्यामुळे ही साक्ष महत्त्वाची होती.
आश्विनी यांची हत्या 11 एप्रिल 20 रोजी रात्री झाली. त्यापुर्वी संध्याकाळी त्या आणि मुख्य आरोपी अभय कुरूंदकर हे ठाणे शहरात भेटले. त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये चहा घेतला. त्यानंतर दोघेही चारचाकी गाडीमधून मीरा रोडच्या गोल्डन नेस्ट परिसरातील कुरुंदकरच्या घरी गेले. दोघांचे मोबाईल जीपीआरएस ठाणे रेल्वे स्थानकापासून ते कुरुंदकरच्या गोल्डन नेस्ट परिसरातील फ्लॅटपर्यंत एकत्र होते, याची नोडल अधिकारी धोत्रे यांच्या सरतपासणीत निश्चित झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai