ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2022
- 757
पुणे ः ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आले होतं. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं. 1969 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची 38 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. अनिल अवचट यांच्या लेखनाची शैली अत्यंत वास्तववादी होती. त्यांच्या या लेखन शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय ठरले. विशेष म्हणजे त्यांची शैली साधी, सरळ आणि अनलंकृत अशी होती. अवचट हे मोठे लेखक होते. पण त्यांचा पिंड कार्यकर्त्यांचा होता. समाजसेवकांचा होता. म्हणूनच त्यांनी तरुण पिढीला सावरण्यासाठी मुक्तांगण संस्थेची उभारणी केली होती.
- अल्प परिचय
अवचट यांनी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. - पुरस्कार
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2017 सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार सृष्टीत. गोष्टीत या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट पुस्तके म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला 12व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (2015) प्रदान करण्यात आला. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai