तोतया वैज्ञानिकाचा कंपन्यांना 10 लाखांचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2022
- 798
अणु किरणोत्सार तपासणी अधिकार्याची बनावट प्रमाणपत्रे विक्री
नवी मुंबई : निर्यात केल्या जाणार्या खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणीच्या अधिकार्याची बनावट प्रमाणपत्रे विक्री केल्याप्रकरणी तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमिळनाडूत राहणार्या वाय. जी. शेखर नावाच्या व्यक्तीने भाभा टोमिक रिसर्च सेंटरमध्ये सहायक वैज्ञानिक असल्याचे भासवून बीएआरसी व बीआरआयटी या प्रशासनाचा बनावट लोगो, प्रमाणपत्र तयार केले आणि खाद्यपदार्थाची निर्यात करणार्या काही कंपन्यांची दिशाभूल करून तब्बल 10 लाख 60 हजार रुपये उकळले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बीआरआयटीच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतामध्ये तयार केले जाणारे खाद्यपदार्थ देशाबाहेर विक्री करायचे असल्यास त्यासाठी खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. ही तपासणी बीआरआयटी या शासनाच्या संस्थेमार्फत केली जाते. या तपासणीत संबंधित खाद्यपदार्थ निर्यात योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित कंपनी त्यांचे उत्पादन देशाबाहेर विक्री करू शकते. या चाचणीचे संपूर्ण अधिकार बीआरआयटी या शासनाच्या संस्थेकडेच आहेत. त्यानंतरही अणु किरणोत्सार चाचणीचे अधिकार खासगी कंपनीला देखील मिळतात असे भासवून तोतया वैज्ञानिकाने दोन कंपन्यांना बनावट अधिकार प्रमाणपत्राची विक्री केली आहे. यासाठी त्याने प्रमाणपत्रावर बीएआरसीच्या मोहोरचादेखील वापर केला आहे. तर या प्रकारातून त्याने दोन कंपन्यांना सुमारे 10 लाख 60 हजारांचा गंडा घातला आहे. वाय.जी.शेखर असे तोतया वैज्ञानिकाचे नाव आहे. त्याने स्वतःला बीएआरसीमधील सहायक वैज्ञानिक असल्याचे सांगून हा प्रकार केला आहे. ही बाब केंद्र सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बीआरआयटीला त्याबाबत कळवले होते. त्यानुसार या संस्थेने चौकशी केली असता, संबंधित प्रकार उघड झाला. त्यानुसार बीआरआयटीच्या अधिकार्यांनी केलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तोतया वैज्ञानिकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांच्या संबंधित अधिकार्यांची भेट घ्यावी लागणार आहे. या प्रकरणावरून नवी मुंबईत तोतया वैज्ञानिकांमार्फत फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai