जेएनपीटी सेझची कामे खासगी कंपन्यांना
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2022
- 623
उरण ः जेएनपीटी बंदरातील साफसफाई, बागबगिच्या देखभालीची कामे स्थानिक मजूर संस्थाना देण्याचे ठरले असताना जेएनपीटी सेझमधील कामे खासगी कंपन्यांना देण्यात आली आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने जेएनपीटी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्था फेडरेशनने दिला आहे.
बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या. त्या बदल्यात जेएनपीटी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ज्यांना नोकर्या मिळणार नाहीत त्यांना सेझमधील साफसफाईची कामे मजूर संस्थेच्या रूपात देण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार गावोगावी मजूर संस्था स्थापन झाल्या. या मजूर संस्थांना 25 वर्षांपूर्वी 25 लाखाचे कामे मिळत होती. दोन वर्षांपूर्वी ही किंमत वाढवून 2 कोटीपर्यंतची साफसफाईची कामे मजूर संस्थांना देण्याचे ठरले. सध्या जेएनपीटीने सेझमध्ये रस्ता साफसफाईचे व बागकामाचे 6.86 कोटीचे काम काढले आहे. मात्र हे काम मजूर संस्थेला न देता खासगी ठेकेदाराला दिल्याने प्रकल्पग्रस्त मजूर संस्था संतप्त झाल्या आहेत.
साफसफाईसाठी मशिनरी आणल्याने 100 हून जास्त प्रकल्पग्रस्तांचा रोजगार बुडणार आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना संघटनांनी साकडेही घातले होते. मात्र योग्य कार्यवाही न झाल्याने जेएनपीटी प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने व आंदोलने करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष जनार्दन भोईर, उपाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, सचिव कुणाल घरत, सल्लागार जे.पी. म्हात्रे यांनी दिला आहे.
- रोजगारांची प्रतीक्षा
जेएनपीटी बंदरावर आधारित देशातील पहिला सेझ प्रकल्प उरणमध्ये उभा राहत असून त्याचे उद्घाटन 2014 मध्ये म्हणजे सात वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. या सेझमध्ये पायाभूत सुविधांसाठी जेएनपीटीकडून 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, तर बंदरावर आधारित सेझमध्ये जवळपास 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. ही गुंतवणूक झाल्यावर येथील उद्योगांची सुरुवात होऊन रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. उद्योगातील गुंतवणुकीसाठी बंदराकडून निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या उद्योगांच्या उभारणीसाठी भूखंडाची खरेदी करून काही प्रमाणात कामालाही सुरुवात केली आहे. मात्र अद्याप स्थानिकांना रोजगाराबाबत ना प्रशिक्षण दिले ना प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai