55 व्या निरंकारी संत समागमाची यशस्वी सांगता
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 19, 2022
- 877
मुंबई : ‘‘ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच निखळ शाश्वत आनंद लपलेला आहे’’असे प्रतिपादन निरंकारीसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहात केले.
सद्गुरु माताजींच्या या आशीर्वचनांद्वारे तीन दिवसीय संत समागमाची यशस्वीरित्या सांगता झाली. व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमाचे थेट प्रक्षेपण मुंबईतील चेंबूर भागात स्थित असलेल्या सत्संग भवनातून मिशनची वेबसाईट व साधना टी.वी.चॅनलवर करण्यात आले. आनंदाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण ईश्वराशी नाते जोडून त्याच्याशी एकरूप होऊ लागतो तेव्हा भक्तीचा असाकाही रंग चढतो, की आम्हाला निरंतर आनंदाची अनुभूती प्राप्त होते. या आनंदामध्ये भक्त अशाप्रकारे तल्लीन होतो की, मग त्याच्यावर कोणाच्या वाईट बोलण्याचा अथवा दुर्व्यवहाराचा प्रभाव पडेनासा होतो. कारण भक्तीद्वारे त्यांने शाश्वत आनंदाची अवस्था प्राप्त केलेली असते. महात्मा गौतम बुद्धांच्या जीवनातील एका घटनेचा उल्लेख करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की एक व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकली तरीही त्यांनी आपल्या शिष्यांना शांत राहण्यास सांगितले आणि म्हटले, की यांचा माझ्याशी काहीतरी जुना हिशेब असेल तो त्याने पूर्ण केला. त्यामुळे आता हा विषय इथे संपला. त्या व्यक्तीच्या अशा दुर्व्यवहारानेसुद्धा महात्मा गौतम बुद्धांच्या आनंद अवस्थेत कोणताही फरक पडला नाही अथवा त्यांच्या मनाची शांती ढळू शकली नाही. आपणही सदैव निराकार ईश्वराशी अनुसंधान ठेवून दृढविश्वासी संतांची संगत करणे गरजेचे आहे. सत्संग, सेवा आणि नामस्मरण करत आपल्या मनाचे नाते सदैव ईश्वराशी जोडून ठेवल्याने आनंदाची अवस्था प्राप्त केली जाऊ शकते.
‘श्रद्धा भक्ती विश्वास असावा, मनामध्ये आनंद वसावा’ या शीर्षकावरील ‘बहुभाषी कवी संमेलन’ संत समागमाच्या तिसर्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले. या विषयावर आधारित मराठी, हिंदी, पंजाबी, कोंकणी, अहिराणी, भोजपुरी व गुजराती अशा सात भाषांतील एकंदर 18 कविंनी अत्यंत प्रभावशाली शैलीत आपल्या भावना काव्यरुपात प्रस्तुत केल्या. संत समागमाच्या सांगता समारोहातील सद्गुरु माताजींच्या दिव्य प्रवचनाचा आनंद भाविक भक्तगणांनी घेतला आणि विश्वास, भक्ती व आनंदाची अनुभूती प्राप्त केली. त्याचबरोबर स्वत:ला या निराकार ईश्वराशी एकरुप झाल्याची दिव्यानुभव प्राप्त केला, जो या संत समागमाचा मुख्य उद्देश होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai