अर्थकारण फुकट्या प्रवाशांचं
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2022
- 1090
एक कोटी 78 लाख लोकांचा विनातिकीट प्रवास
मुंबईः 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये भारतीय रेल्वेने एक कोटी 78 लाख फुकट्या प्रवाशांना पकडलं. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 79 टक्के जास्त आहे. मध्य प्रदेशातल्या चंद्रशेखर गौर या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना रेल्वे मंडळाने हा डाटा उपलब्ध करून दिला आहे. एक कोटी 78 लाख लोकांना विनातिकीट प्रवास करताना पकडल्याचं रेल्वेने म्हतलं आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तरावरून दिसून आलं की एप्रिल-डिसेंबर 2021 दरम्यान, एक कोटी 78 लाख लोकांनी एक तर तिकीट काढलं नव्हते किंवा वेगळ्या श्रेणीत प्रवास केला.
भारतीय रेल्वेने सांगितलं की या प्रवाशांकडून एक हजार 17 कोटी 48 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तिकीट नसलेल्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे कोरोना. कोरोनाशी संबंधित निर्बंधांमुळे बहुतेक एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांमधलं सीट बुकिंग केवळ ऑनलाईन किंवा मर्यादित मार्गाने होत होतं आणि त्यांच्या सेवा मर्यादित होत्या. एका अधिकार्याने सांगितलं की प्रवासावर कठोर निर्बंध आणल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये लोक अधिक प्रवास करत आहेत. प्रवाशांची संख्या वाढली तरी गाड्यांची संख्या आणि वारंवारता वाढली नाही. माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या अर्जाला उत्तर देताना भारतीय रेल्वेने सांगितलं की 2020-21 मध्ये देशात टाळेबंदी होती. रेल्वने प्रवास करण्यावर कठोर निर्बंध होते. त्यानंतर ही संख्या 27 लाख होती.
प्रतीक्षा यादीमुळे 52 लाख लोकांना प्रवास करता आला नाही. त्याचप्रमाणे, 2019-20 या आर्थिक वर्षात कोरोना कालावधीपूर्वी सुमारे एक कोटी दहा लाख लोक ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले होते. त्यांच्याकडून रेल्वेने 561 कोटी 73 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. दुसरीकडे, एप्रिल-डिसेंबर 2020 या आर्थिक वर्षात एकूण 27 लाख 57 हजार लोक विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले. त्यांच्याकडून 143 कोटी 82 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 52 लाखांहून अधिक लोक प्रतीक्षा यादीत अडकल्यामुळे प्रवास करू शकले नाहीत. यामुळे व्यस्त मार्गांवर अधिक गाड्यांची गरज असल्याचं दिसून येतं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai