Breaking News
मास्को : युक्रेनमधील खारकिव्हमध्ये मूळचा कर्नाटकातील 21 वर्षाचा विद्यार्थी नवीन शेखराप्पा याला रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी तो जवळच्या एका सुपरमार्केटमधील रांगेत उभा होता. त्याचवेळी रशियाचा एक बॉम्ब काळ म्हणून आला आणि त्यात त्याचा जीव गेला.
रशियाने आता युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तातडीने कीव शहर सोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरिकांना दुतावासाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत. नवीन शेखराप्पा हा मूळचा कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील. तो युक्रेनमध्ये मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी गेला होता. खारकिव्हमधील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तो चौथ्या वर्षात शिकत होता. रशियन सैन्याने केलेल्या एका एअरस्टाईकमध्ये त्याचा मृत्यू झाला. खारकिव्हमधील शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या समन्वयकांनी सांगितलं की, नवीन शेखराप्पाचा मोबाईल फोन या हल्ल्याच्या ठिकाणी सापडला. त्याचे प्रेत हे शवगृहात पाठवलं आहे. या घटेनेची माहिती नवीन शेखराप्पासोबत शिकत असलेल्या एका मुलीने दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी नवीन शेखराप्पाच्या घरी पोहोचले असून त्यांनी नवीनचे प्रेत हे शवगृहात पाठवल्याची माहिती त्यांना दिली आहे. असं असलं तरी नवीनचे प्रेत हे भारतात आणणे शक्य आहे याची शाश्वती मंत्रालयातील अधिकार्यांनी दिली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai