दोन वर्षांनंतर हापुसची जपानवारी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 31, 2022
- 731
नवी मुंबई ः कोकणातील हापूस जगप्रसिद्द असल्याने त्याची परदेशा निर्यात केली जाते. मात्र दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावात गेल्याने आंब्याच्या निर्यातीला खीळ बसली होती. मात्र या वर्षी कोरोनाचे सावट दूर झाले असल्याने आंबानिर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि सरकारची आंबा निर्यात करणारी संस्था ‘अपेडा’ आंबानिर्यातीसाठी सज्ज झाली आहे. त्यानुसार दोन वर्षांनंतर या वर्षी पहिल्यांदा जपानसाठी हापूस आणि केशर आंबा निर्यात झाला आहे.
आंबानिर्यातीला चालना देत, कृषी पणन मंडळ आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात ‘अपेडा’च्या वतीने या हंगामातील कोकणातील अस्सल हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप शनिवारी जपानला निर्यात केली. जपानमध्ये आंबा पाठवण्यासाठी ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ ही प्रक्रिया करून आंब्याची निर्यात करावी लागते. त्यानुसार ही प्रक्रिया करून आंबा निर्यात करण्यात आला आहे. या वर्षी जपान आणि कोरियामध्ये 50 मेट्रिक टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या देशात आंबा निर्यात करताना त्यांच्या देशातील अन्न निरीक्षक येऊन येथील आंबा प्रक्रिया केंद्रातील सुविधांची पाहणी करतात आणि त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यावर आंबानिर्यातीला परवानगी मिळते. मात्र या वर्षी हे अन्न निरीक्षक येणार नसल्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ते पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार, 26 मार्च रोजी पहिला आंबा जपानला रवाना झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai