बांधकाम व्यावसायिक नलिन शहांवर गुन्हा दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 05, 2022
- 770
नवी मुंबई ः नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नलिन शहा व नरविन नलिन शहा यांच्यावर 1 एप्रिल 2022 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर येथील बंद गृहप्रकल्पात सदनिका देण्याच्या बहाण्याने तक्रारदारांकडून 40 लाख रुपये रक्कम घेऊन 5 वर्ष उलटूनही घराचा ताबा न देता 10 लाख परत करुन उर्वरित 30 लाख परत करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खारघर येथील शहा किंगडम या प्रकल्पाचे काम बंद असतानाही व पुन्हा सुरु होणार नाही याची कल्पना असतानाही बांधकाम व्यावसायिक नलिन शहा यांनी हमजा अब्दुला जलगांवकर(बांधकाम व्यावसायिक), रा. माणगांव, रायगड यांची फसवणुक करुन या प्रकल्पात सदनिका बुकिंगसाठी एप्रिल 2017 रोजी चेक व रोख रक्कम स्वरुपात 40 लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना घराचे अलॉटमेंट लेटर दिले नाही. प्रकल्प बंद होऊनही त्यांना पैसे परत करण्यात आले नाही. जलगांवकर यांनी तगादा लावल्याने केवळ 10 लाख परत करुन उर्वरित 30 लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच जलगांवकर यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरुन भादवि कलम 420, 406, 34 प्रमाणे नलिन शहा व नरविन नलिन शहा यांच्यावर 1 एप्रिल 2022 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सम्राट वाघ करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai