Breaking News
नवी मुंबई : सानपाडा, नेरुळ, खारघर भागात बेकायदा अमली पदार्थ विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली. या तिन्ही घटना वेगळ्या असून त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
सानपाडा उड्डाणपुलाखाली एक व्यक्ती गांजा विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. यात आरोपी वाजीद अब्दुललतिफ खान हा अलगद अडकला. वाजीद हा उड्डाणपुलाखालील चौकात एका मिठाईच्या दुकानासमोर उभा असताना पोलिसांनी त्याला पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 5 किलो 500 ग्रँम वाजनाचा गांजा आढळून आला. सदर गांजा त्याचा मोबाइल आणि कारसह 3 लाख 42 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बालाजी झोपडपट्टी परिसरात करण्यात आली. पाइपलाइन शेजारी राहणारी महिला शोभा कांबळे ही घरातूनच गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर सय्यद यांनी महिला पथक पाठवून तिला ताब्यात घेत झडती घेतली. तिच्याकडे 810 ग्राम वजनाचा गांजा आढळून आला. हा 16 हजार 200 रुपयांचा गांजा आणि 250 ची रोकड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तिसरी कारवाई खारघर येथे बेलपाडा गावात अफसाना उर्फ रुक्साना शेख हिच्याकडेही 15 हजार 100 रुपयांचा गांजा आढळून आला. या तिन्ही कारवाईत मिळून 1 लाख 67 हजार 700 रुपयांचा 6 किली 870 ग्रम गांजा रोख रक्कम, 1 कार आणि 1 मोबाइल असा 2 लाख 5 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल असे एकूण 3 लाख 73 हजार 550 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिह यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai