देशात दोन लाख बालकांना जन्मजात हृदयरोग
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 23, 2022
- 720
मुंबई ः देशात नवजात आणि लहान मुलांमधले जन्मजात आजार झपाट्याने वाढत आहेत. यापैकी एक म्हणजे जन्मजात हृदयरोग. बाळाला गर्भातच हृदयाचा त्रास होऊ लागतो, तेव्हा सीएचडीफचा रुग्ण मानलं जातं. आकडेवारीनुसार, भारतात दर वर्षी सुमारे दोन लाख बालकं हृदयरोगासह जन्माला येतात.
कारणे
उत्तर भारतात फक्त 17 टक्के, दक्षिण भारतात 72 टक्के तर ईशान्य भारतात शून्य टक्के मुलांवर उपचार केले जातात. मधुमेह, गर्भधारणेदरम्यान संसर्ग, एक्स-रे रेडिएशन आणि गर्भधारणेदरम्यान चुकीच्या औषधांचा वापर हे जन्मजात हृदयरोगासाठी काही जोखीम घटक आहेत. याशिवाय गर्भवती महिलेला धूम्रपान आणि दारूचं व्यसन असेल तर ते बाळाच्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं.
लक्षण
जन्मजात हृदयरोग हा अनुवंशिक रोगदेखील असू शकतो. जन्मजात हृदयरोगावर योग्य वेळी उपचार केले न गेल्यास मुलाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. यासोबतच वजन न वाढणं हीदेखील गुंतागुंत आहे. या आजारामुळे मुलांच्या विकासावरही परिणाम होतो. जन्मजात हृदयरोग जडलेला असणार्या रुग्णांच्या हृदयाची गती कधी वेगवान असते तर कधी मंद असते. त्यांना हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही असतो.
परिणाम
जन्मजात हृदयरोगाचा परिणाम मुलांच्या शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर होतो. त्याला सतत मूड स्विंग्ज असतात. शारीरिक विकासाअभावी ते असुरक्षिततेला बळी पडतात. जन्मजात हृदयरोगाचं कोणतंही अचूक कारण नसल्यामुळे ते टाळणं कठीण होतं. तरीही काहीपद्धती आपल्याला मदत करू शकतात.
उपाय
गर्भधारणेचं नियोजन करण्यापूर्वी रुबेला लस घ्यावी. मधुमेह, अपस्मार यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवावं. गर्भधारणेदरम्यान कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं. धूम्रपान आणि मद्यपान टाळावं. रेडिएशनच्या संपर्कात येऊ नये. गर्भधारणेच्या नियोजनाच्या दोन-तीन महिने आधी फॉलिक ऍसिड असलेलं मल्टीविटामिन घेणं सुरू करावं. त्यामुळे बाळाला पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai