पालिका मुख्यालयाचे घाईगडबडीत भूमिपुजन
- by Aajchi Navi Mumbai
- May 07, 2022
- 692
280 कोटी खर्च अपेक्षित; कामाचा ठेका हर्ष कन्स्ट्रक्शनला
पनवेल : पनवेल महापालिका मुख्यालयाच्या इमारतीची मंगळवारी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कोणताही गाजावाजा न करता पायाभरणी करण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र सत्ताधारी आणि विरोधक एकत्र हजर असल्याने श्रेयवादासाठी हा कार्यक्रम घाईत उरकण्यात आल्याची चर्चा पनवेलमध्ये आहे.
नवीन पनवेल, सेक्टर 16 मधील भूखंडावर महापालिकेचे मुख्यालय बांधण्यात येणार आहे. प्रस्तावित मुख्यालयाची इमारत ही सहा मजली आहे. यासाठी अंदाजे 280 कोटी खर्च अपेक्षित असून कामाचा ठेका हर्ष कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. या मुख्यालयाच्या भुमिपुजनाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चार्च होती. मात्र अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या मुहूर्तावर मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी घाईघाईत करण्यात आल्याने याबाबत चर्चांना उधाण आले आहे. महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. महापालिकेची मुदत संपत असल्याने महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात जाईल आणि कामाचे श्रेय घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या हस्ते कार्यक्रम करण्यात येईल, म्हणून हे भूमिपूजन घाईघाईने केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.
या कार्यक्रमाला आयुक्तांसह इतर अधिकारी अनुपस्थित होते. संबंधित कार्यक्रम प्रशासनाचा अधिकृत कार्यक्रम नसल्याची माहिती समोर आळी आहे. मात्र प्रशासनाचा अधिकृत कोणताही कार्यक्रम नसताना सत्ताधार्यांसह विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे देखील उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील महापालिका मुख्यालय, महापौर बंगला, प्रभाग समिती कार्यालयासह इतर मोठ्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांची वेळ मागितली आहे. पाया खोदण्याच्या कामाला पावसाळ्यात अडचण येऊ नये म्हणून छोटेखानी कार्यक्रम करून पायाभरणी केली. मंत्र्यांच्या उपस्थित पुन्हा औचपारिक भुमीपुजन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai