नागरी समस्या सोडवण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन
- by Aajchi Navi Mumbai
- May 10, 2022
- 617
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी घेतली आयुक्तांची भेट
नवी मुंबई ः विविध भागांतील नागरी समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी विविध नोडमध्ये असणार्या निरनिराळ्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. तसेच परिवहनमधील ठोक मानधनावरी कामगारांना कायम करणे, शिक्षकांना वेतनवाढ करणे याबाबत निवेदन दिले.
शिवसेना उपनेते, पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) विजय नाहटा यांनी शिष्टमंडळासह सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. भेटीदरम्यान नवी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेतील ठोक मानधनावरील तसेच रोजंदारीवरील वाहक आणि चालक यांना परिवहन सेवेत कायम करण्याची मागणी केली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनवाढी संदर्भातील समस्या, इ.टी.सी. केंद्रातील करार पद्धतीवरील थेरपिस्ट कर्मचार्यांच्या वेतनवाढीबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे एम.पी.डब्लू. कर्मचार्यांच्या असणार्या समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तुर्भे नाका हनुमान नगर येथील असणार्या नागरिकांच्या समस्या बाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पावसाळी कामे लवकरात लवकर करण्यात यावीत तसेच सानपाडा नेरुळ या ठिकाणच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे तेथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी पाण्याचे प्रेशर वाढविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. वरील सर्व मागण्या संदर्भात चर्चा करून आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हा प्रमुख व्दारकानाथ भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,मिलिंद सूर्यराव, रोहिदास पाटील, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, ज्ञानेश्वर सुतार, काशिनाथ पवार, रतन मांडवे, दिलीप घोडेकर, सरोजताई पाटील, मनोज हळदणकर, राजू पाटील, राजू कांबळे, बहादूर बिस्ट, रामआशिष यादव, चेतन नाईक, आकाश मडवी, सुरेश भिलारे तसेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख विभाग प्रमुख,शाखा प्रमुख,युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai